Wednesday, 15 August 2018

‘भिक नको रोजगार द्या’, विद्यार्थी संघर्ष समितीचा मोर्चा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

स्पर्धा परीक्षा भरती प्रक्रिये विरोधात महाराष्ट्र राज्य स्पर्धा परीक्षा विद्यार्थी संघर्ष समितीतर्फे आज मुंबईत आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय. राज्यात गेल्या काही वर्षांपासून विविध विभागातील रिक्त पदे भरली जात नसल्यानं स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली असून, याविरोधात आता महाराष्ट्र राज्य स्पर्धा परीक्षा विद्यार्थी संघर्ष समिती आक्रमक झालीय.

सर्व भरती प्रक्रियेला धरून या महामोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, या महामोर्चासाठी राज्यातील सर्व विद्यार्थी संघटना एकत्र आलेत. हजारो विद्यार्थी या मोर्चात सामील झालेत. याआधी याच प्रकारचा एमपीएससी विद्यार्थ्यांचा मोर्चा पुणे, औरंगाबाद जिल्ह्यात पाहायला मिळाला होता.

loading...

Top 10 News

Facebook Likebox