Wednesday, 16 January 2019

विश्वास पाटीलांची चौकशी सीआयडीमार्फत, रविंद्र वायकरांची विधानसभेत घोषणा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मुंबईच्या एसआरए योजनेतील घोटाळ्याप्रकरणी गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी विभानसभेत धक्कादायक खुलासा केलाय. झोपडपट्टी पुनवर्सन विकास योजनेची सरकारी फाईल गहाळ झाल्याची माहिती वायकर यांनी दिलीये. माजी सनदी अधिकारी विश्वास पाटील यांच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीचा अहवाल देखील गहाळ झाल्याचं रविंद्र वायकर यांनी सांगितलंय.

तसेच, या प्रकरणात 137 पैकी 33 फाइल्समध्ये भ्रष्टाचार सिद्ध झाल्याचे देखील वायकर यांनी स्पष्ट केलंय. यासंदर्भात निर्मलनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून आता विश्वास पाटील यांच्या एसआरए घोटाळाप्रकरणाची चौकशी सीआयडीमार्फत करण्यात येईल अशी घोषणा रविंद्र वायकर यांनी केलीय.

loading...

Top 10 News

राशी भविष्य