Monday, 17 December 2018

नशीब बलवत्तर; चौथ्या मजल्यावरून पडूनही मांजर बचावली

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

भिवंडीतल्या निजामपूरमध्ये चौथ्या मजल्यावर अडकून पडलेलं मांजर सुखरुप बचावलंय. गेल्या 3-4 दिवसांपासून हे मांजर इमारतीच्या चौथ्या मजल्यावर अडकले होते. भूकेमुळे व्याकुळ झाल्याने ही मांजर जोर-जोरात ओरडत होती. यामुळे येथील रहिवाशांनी तिला काढण्याचा प्रयत्नही केला. मात्र, मांजर खाली पडून दगावेल या भीतीने नागरिकांनी भिवंडी अग्निशमन दलाच्या जवानांना कॉल करून बोलवून घेतले.

मात्र अग्निशमन दलाकडे मांजराला वाचवण्यासाठी अपुरं साहित्य असल्याचे दिसून आले. दरम्यान, या मांजरीला दोरखंडामध्ये अडकवून कापड्याच्या झोळीने इमारतीच्या चौथ्या मजल्याच्या बाहेरील सज्जावरून अथक प्रयत्न करून काढले. मात्र ही मांजर व्यवस्थितपणे कापड्याच्या झोळी न येता ती थेट चौथ्या मजल्यावरून जमिनीवर पडली व काही क्षणातच तिने खाली पडता पडताच धूम ठोकली.

loading...

Top 10 News

राशी भविष्य