Monday, 17 December 2018

थोड्याच वेळात सरकार आणि किसान सभेच्या शिष्टमंडळाची चर्चा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

थोड्याच वेळात सरकार आणि किसान सभेच्या शिष्टमंडळाची चर्चा होणार आहे.

"महत्वाच्या मागण्या घेऊन मोर्चा नाशिकमधून आला. 90 ते 95 टक्के गरीब आदिवासी मोर्चात सहभागी आहेत. सुरुवातीपासून मोर्चेकऱ्यांशी सरकार संपर्कात आहे.मात्र ते मोर्चावर ठाम होते.शिस्तबद्ध आणि विद्यार्थ्यांना अडथळा न आणता मोर्चा काढल्याबद्दल त्यांचं कौतुक.वनजमिनीचा हक्काचा प्रश्न प्रमुख आहे. सरकार सकारात्मक आणि संवेदनशील आहे. आम्हाला समर्थन देता येत नाही निर्णय घ्यावा लागतो याची पूर्ण जाणीव आहे.त्यांच्या मागण्यांवर टाइम बाऊंड तयार करण्याच्या सरकारचा प्रयत्न आहे. त्यांच्या न्याय्य मागण्यांची दखल सरकार घेणार" - मुख्यमंत्री

रक्ताळलेले पाय घेऊन 200 किलोमीटरची पायपीट केलेला बळीराजा अखेर आझाद मैदानावर धडकला. विविध मागण्यांसाठी नाशिकहून मुंबईकडे पायी निघालेला किसान सभेचा मोर्चा आज पहाटे आझाद मैदानात दाखल झाला.

संपूर्ण कर्जमाफी, शेतमालाला भाव, वनजमिनींचं हस्तांतरण अशा मागण्या मान्य केल्याशिवाय आता मुंबई सोडणार नाही, अशी गर्जना शेतकऱ्यांनी केली आहे. खरंतर आज सकाळी ठाण्याहून मोर्चा मुंबईकडे निघणार होता, मात्र दहावी-बारावीच्या परीक्षार्थींना त्रास होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी त्रास सोसत रात्रीच आझाद मैदान गाठलं.


सोमय्या मैदानातून रात्री उशीरा मोर्चेकऱ्यांनी आझाद मैदानाकडे कूच केली. परीक्षांच्या काळात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मोर्चेकऱ्यांनी रात्रीत कूच करण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांची उच्च स्तरीय मंत्रीगटासोबत विधिमंडळात बैठक सुरु. चंद्रकांत पाटील, सुभाष देशमुख, गिरीश महाजन, विष्णू सावरा, पांडुरंग फुंडकर आणि एकनाथ शिंदे बैठकीला उपस्थित. किसान मोर्चाच्या मागण्यांवर होणार चर्चा


सरकारने आता जर ठोस भूमिका घेतली नाही, तर शेतकऱ्यांचा हा ज्वालामुखी सरकारला भस्मसात केल्याशिवाय राहणार नाही. गेल्या सहा दिवसांपासून शेतकरी पायपीट करत आहेत, मात्र काल रात्री मंत्रीगट स्थापन केला गेला. हे सरकार इतके दिवस काय झोपा काढत होतं का? सोंग घेतलेलं सरकार आता खडबडून जागं झालं आहे - विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील

आझाद मैदानात मुंबई मनपाकडून जय्यत तयारी, अनेक रुग्णवाहिका मैदानात. मुस्लिम संघटानंकडून शेतकऱ्यांना पाणी, बिस्किटांचं वाटप. आझाद मैदानात मुंबईकरांचा शेतकऱ्यांन मदतीचा हात.

किसान सभेचं शिष्टमंडळ आणि सरकारमधल्या बैठकीच्या वेळेत बदल झाला आहे. बैठक दुपारी 2 वाजता होणार आहेत. दुपारी 11 वाजता विधिमंडळात कै. पतंगराव कदम यांचा शोक प्रस्ताव आणि 12 वाजता राज्यसभेचे उमेदवारी अर्ज भरणार असल्याने, दोन तासांनी बैठक पुढे ढकलली.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आम्ही कटिबद्ध आहोत, शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी मी तयार : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत

हे सरकार शेतकऱ्यांचं आहे, कष्टकऱ्यांचं आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढू : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

loading...

Top 10 News

राशी भविष्य