Sunday, 20 January 2019

सिंहगड एक्सप्रेसमुळे, चाकरमानी त्रस्त

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र, मुंबई

कामानिमित्त पुण्यावरून मुंबईला जाणाऱ्या चाकरमानांचे हाल होत आहेत. रोज सकाळी उशिरा येणारी गाडी आणि कामावर पोहोचायला उशीर, याने सिंहगड एक्सप्रेस मधील प्रवासी त्रस्त आहेत.

पुणे स्टेशनवरून, सिंहगड एक्सप्रेस सकाळी 6 वाजून 5 मिनिटांनी सुटते. ती मुंबई शिवाजी टर्मिनसला 9.55 मिनिटांनी पोहोचणे अपेक्षित असते, मात्र एक्सप्रेस 10.40 ला पोहोचते. त्यामुळे अनेक सरकारी नोकरदार किंवा खासगी कंपनीतील कर्मचाऱ्यांना, कामावर पोहोचायला उशीर होतो, पर्यायी त्यांच्या पगारावर त्याचा परिणाम होतो. 

बायोमैट्रिक सिस्टम मुळे एक सेकंद जरी उशीर झाला तरी अर्धा दिवस लावला जातो, पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्यांसाठी डेक्कन एक्स्प्रेस ही सोयीस्कर आहे मात्र तिची गत ही सिंहगड एक्सप्रेस सारखीचं आहे. डेक्कन क्वीन सकाळी 7.10 ला सुटते आणि तिची निर्धारित वेळ 10 वाजून 20 मिनिटांनी मुंबईला पोहोचण्याची असते मात्र ती अकराच्या पुढे जाते. त्यामुळे सर्व प्रवाशांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. गेली अनेक वर्ष नोकरी निम्मित प्रवास करणाऱ्या नोकरदारांनी अनेक वेळा रेल्वे मंत्री, खासदार, आमदार यांचे उंबरठे झिजवले आहेत परंतु त्यांच्या हाती निराशाचं लागली. ही बाब रेल्वे प्रशासनाने गंभीरपणे घेणे गरजेचे आहे. 

 

 

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य