Sunday, 18 November 2018

कल्याणच्या वाडेघर डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याला आग; 10 तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

कल्याणच्या वाडेघर डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याला मंगळवारी रात्री भीषण आग लागली होती. सुमारे 10 तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर ही आग अटोक्यात आणण्यात आली.

कल्याण येथील खाडी किनाऱ्याच्या बाजूला असणाऱ्या कचऱ्याला मंगळवारी रात्री 8 ते 9 च्या दरम्यान ही आग लागली होती. आग लागली आणि ती वाऱ्यामुळे जोरात पसरत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी आणि नगरसेवक तसेच भाजप गटनेते वरुण पाटील यांनी दिली.

आग लागल्याचे समजताच अग्निशमन दलाच्या 3 गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. सुमारे 10 तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर ही आग अटोक्यात आणण्यात आली. सुदैवाने या दुर्घटनेट कोणतीही जीवित हानी झालेली नाहूी.

या आगीमुळे डम्पिंग ग्राऊंड शेजारील परिसरावर धुराचे मोठे लोट पसरले असून वाऱ्यामुळे हा धूर सर्वत्र पसरला होता. या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र आगीच्या अशा दुर्घटना वारंवार समोर येत आहेत.

loading...

Top 10 News

राशी भविष्य