Monday, 17 December 2018

गुगलने साजरा केला धुळवडीचा आनंदोत्सव

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज,मुंबई

आज देशभरात धुळवडीचा उत्साह असताना गुगलकडूनही हा आनंदोत्सव साजरा केला जातोय. गुगुलनं डुडलच्या माध्यमातून रंगांची उधळण करत देशवासीयांना धुळवडीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

विविध रंगामध्ये नटलेलं हे आकर्षक डुडल होळी आणि धुळवडीचा उत्साह द्विगुणीत करणार आहे. ढोल वाजवणारी, पिचकारी उडवणारी, रंगांची उधळण करणारी अशी विविध माणसं या डुडलमध्ये दिसतात. या डुडलवर क्लिक केल्यावर होळी या सणाविषयी सगळी माहिती जगभरातील नागरिकांना वाचता येऊ शकते. रंगांच्या या उत्सवात गुगल डुडलही न्हाऊन निघालंय असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

loading...

Top 10 News

राशी भविष्य