Tuesday, 11 December 2018

अपल्या मागण्यांसाठी शिक्षकांचा मोर्चा आता थेट मंत्रालया पर्यंत

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

सरकार दरबारी प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी आज राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्यावतीने मंत्रालयावर मोर्चा काढला जाणार आहे.

या मोर्चात राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांबरोबरच निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या संघटनांचे तब्बल 2 लाखाहून जास्त कर्मचारी सहभागी होणार आहेत. शिक्षकांच्या तब्बल 91 संघटनांनीही या मोर्चाला पाठिंबा दर्शवला आहे. एवढचं नव्हेतर शिक्षकांनी पाठिंबा देत या मोर्चात सहभागी होण्याचं ठरवलं आहे. बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मिलिंद सरदेशमुख यांनी याबाबतचा खुलासा केला आहे.

दरम्यान, दुसरीकडे बारावीच्या विज्ञान शाखेच्या परीक्षा बुधवारपासून सुरु असतानाच कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनीही पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे सरकारला राज्य सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांच्या आक्रोशाचा सामना करावा लागणार आहे हे निश्चीत. सरकार हा प्रश्न कसं सोडवतं, ते पाहणं गरजेच ठरेल.

loading...

Top 10 News

राशी भविष्य