Saturday, 15 December 2018

नीरव मोदीची अलिबागमधील संपत्ती जप्त

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

नीरव मोदीच्या संपत्तीवर सीबीआय आणि ईडीची छापेमारी अजूनही सुरुच आहे. पंजाब नॅशनल बँकेला साडे अकरा हजार कोटींचा गंडा घालून देशाबाहेर पसार झालेला आहे. नीरव मोदीचा रायगड जिल्ह्यातील किहीम येथील आलिशान बंगला आणि दोन कार यावर सीबीआयने छापे टाकून आहेत आणि सील केले आहेत.

अलिबाग तालुक्यात किहीम समुद्र किनाऱ्यालगत 70 गुंठ्याच्या जागेत आलिशान बंगला आहे. तसेच या बंगल्यात तब्बल 13 कर्मचारी काम करत होते. मंगळवारी दुपारी नीरव मोदीच्या बंगल्यावर मुंबईच्या सीबीआय पथकाने धाड टाकली. या बंगल्यातदोन कारही  आढळल्या त्याही सील करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, सीबीआय अधिकारी आणि पोलिसांनी मात्र माध्यमांशी बोलणं टाळलं आहे. हा बंगला सुमारे 4 कोटींच्या घरातील असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य