Tuesday, 11 December 2018

...म्हणून या दाम्पत्याने स्वत:चे आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला; कारण वाचून तुम्हालाही धक्का बसेल

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

गिरगावात राहणारे लवाटे दाम्पत्य पुन्हा एकदा चर्चेत आलेत. राष्ट्रपतींकडे केलेल्या इच्छामरणाच्या अर्जावर कोणतेच उत्तर न आल्याने आता या दाम्पत्याने स्वत:चे आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतलाय. राष्ट्रपतींकडून 31 मार्चपर्यंत उत्तर न आल्यास पतीने आपली हत्या करावी आणि शिक्षा म्हणून त्यांनाही मृत्यूदंड मिळेल, असे पत्र पत्नी इरावती लवाटे यांनी आपल्या पतीला लिहिले आहे.

ठाकूरद्वारला राहणारे नारायण लवाटे (87) आणि त्यांच्या पत्नी इरावती लवाटे (87) यांना वृद्धापकाळामुळे आयुष्यात परावलंबित्व नको आहे. त्यामुळे गेली कित्येक वर्षे हे दाम्पत्य इच्छामरणाची मागणी करत आहे. अलिकडेच दोघांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून इच्छामरणाची मागणी केली होती. पण त्यावर उत्तर आले नाही. त्यामुळे या दाम्पत्यानं स्वत:चे आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतलाय.

loading...

Top 10 News

राशी भविष्य