Tuesday, 11 December 2018

लग्न समारंभात पनीर,गाजर हलवा खाल्ला अन् रुग्णालयात भरती करण्याची वेळ आली

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, पालघर

पालघर तालुक्यातल्या माकुणसारमध्ये एका लग्न समारंभात भोजनातून विषबाधा झाल्याची घटना घडलीय. जवळजवळ 80 ते 100 जणांना विषबाधा झाली असून या सर्वांना उपचारासाठी विविध रुग्णालयात दाखल करण्यात आलयं.

माकुणसार येथील विवेक बालकृष्ण वर्तक यांच्या घरी रविवारी लग्न समारंभाचा कार्यक्रम होता. या लग्नात जवळपास तिनशेहून अधिक पाहूणे उपस्थित होते. यातील बहूतेकांनी पनीर आणि गाजर हलवा हे पदार्थ खाल्ले.

या पदार्थातून विषबाधा झाल्याचे सांगण्यात येत आहे. आपण लग्न समारंभात आपल्या आवडीचे पदार्थ अगदी आनंदाने  खातो. त्यावेळी ते विषबाधित आहे. हे आपल्याला माहितच नसते. 

loading...

Top 10 News

राशी भविष्य