Sunday, 18 November 2018

काच फोडून लाखोंचे दागिने लंपास; कल्याणमधील धक्कादायक प्रकार

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

एका कारची भरदिवसा काच फोडून सुमारे 6 ते 7 लांखाचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना कल्याण पूर्वेकडील हॉटेल सरोवरसमोर घडली असून घटनास्थळी कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे पथक दाखल झाले आहे. मात्र, भरदिवसा घडलेल्या या चोरीमुळे कल्याण पूर्वेत खळबळ माजली आहे.

कल्याण परिसरातील रहिवासी बांधकाम व्यावसायिक अजय सिंग यांनी बॅंक लॉकरमधून दागिने काढून आपल्या कारच्या मागच्या सीटवर ठेवले होते. त्यानंतर काही कारणास्तव त्यांनी गाडी एका हॉटेलसमोर उभी केली. अवघ्या दहा मिनिटांच्या कालावधीत कारची काच फोडून सुमारे 6 ते 7 लाखांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. घरात लग्न सराई असल्याने अजय सिंग यांनी बॅंकेतून दागिने काढून आणले होते.

loading...

Top 10 News

राशी भविष्य