Friday, 14 December 2018

दिवसाच्या सुरूवातीलाच माया-लेकींनी गमावला जीव

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, नवी मुंबई

नवी मुंबईत दुकानाला लागलेल्या आगीत मायलेकीचा गुदमरुन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ऐरोली सेक्टरमध्ये नॉव्हेल्टी स्टोअरला आग लागली होती. आग इतकी भीषण होती, की यात 25 वर्षीय महिलेचा आणि तिच्या 5 वर्षांच्या चिमुरडीचा आगीत गुदमरुन मृत्यू झाला. मंजू चौधरी आणि मुलगी गायत्री चौधरी असं माया-लेकींच नाव आहे.

गुरुवारी पहाटे साडे तीनच्या सुमारास दुकानात शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली होती. आग भडकण्याचे मुख्य कारण म्हणजे दुकानात खेळण्याचेही साहित्य आणि प्लास्टिकचं सामान भरुण ठेवले होते. त्यामुळेच सर्वत्र धुराचं साम्राज्य पसरलं.

आग लागल्यावर मंजू यांचे पती दोन वर्षांच्या मुलीला घेऊन घराबाहेर धावले. पत्नी आणि मोठ्या मुलीला घराबाहेर आणण्यासाठी ते पुन्हा गेले. मात्र, आगीमुळे दोघींना पटकन घराबाहेर पडता आले नाही. तोपर्यंत मायलेकीने गुदमरुन प्राण सोडले होते. मात्र, मंजू यांचे पती दोन वर्षांच्या मुलीचे यात प्राण वाचले आहेत.

navi-Mumabi-aag.jpg

loading...

Top 10 News

राशी भविष्य