Thursday, 17 January 2019

मुलीचं लग्न कसं करायचं? हा विचार डोक्यात घोळत असताना “त्याने” उचललं टोकाच पाऊल

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुलीचं लग्न कसं करायचं? या चिंतेतून वडवाणी तालुक्यातील खळवट लिंबगाव येथील ऊसतोड कामागर भागवत यांनी आज सकाळी गळाफास घेऊन आत्महत्या केली.

डोक्यावर खासगी सावकारसह दोन बँकेचे कर्ज  अशा परिस्थितीमध्ये मुलीची लग्न कसं करायचं.  परंतु खिशात पैसा नाही सरकारच्या कर्जमाफी योजनेमध्येही नाव आलं नाही. या विवंचनेतून आणि चिंतेत असलेल्या 42 वर्षीय ऊसतोड कामगार भागवत यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे.

भागवत यांना तीन एकर शेती होती. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून कुटुंबाची उपजीविका भागवता येत नसल्यामुळे भागवत हे छत्रपती सहकारी साखर कारखान्यासाठी ऊसतोडीचे काम करत होते.

पण, डोक्यावर कर्जाचा डोंगर आणि अशा स्थितीमध्ये मुलीची ही लग्न करायचय पण पैसे नसल्यामुळे भागवत यांनी घरामागे असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य