Thursday, 17 January 2019

गारपीटीमुळे उध्वस्त झालेल्या विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतक-यांच्या मदतीसाठी धावून येणार NDRF

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

एखादी मोठी आपत्ती आली की मदतीसाठी NDRF ला पाचारण केलं जातं. गारपीटीमुळे उध्वस्त झालेल्या विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतक-यांसाठीही आता NDRF मदतीसाठी येणार आहे.

गारपीटग्रस्त शेतक-यांना NDRF मार्फत मदत दिली जाणार असल्याची घोषणा कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी केलीये.

11 आणि 12  फेब्रुवारीला झालेल्या गारपीटीमुळे प्रचंड नुकसान झालं असुन आत्तापर्यत 16 जिल्ह्यातल्या 61 तालुक्यातल्या 1279 गावात  1 लाख 27 हजार 322 क्षेत्राचे नुकसान झालंची माहिती समोर आलेय.

ज्या शेतक-यांनी विमा काढला असेल त्यांना विमा काढला त्यांना विम्याची मदत आणि एनडीआरएफचीही मदत मिळेलचं.

मात्र, ज्या शेतक-यांनी विमा नाही काढला त्यांनाही मदत केली जाणार असल्याची घोषणा फुंडकर यांनी केलीये. पिकांची वर्गवारी करण्यात येणार असुन पिकनिहाय आकडेवारी आल्यानंतर तात्काळ मदत करणार असल्याचं फुंडकर यांनी सांगितलंय.

याशिवाय. राज्यसरकारने केंद्राकडेही 200 कोटींची मदत केंद्राकडे मागितलं असल्याचंही फुंडकर म्हणाले.

loading...

Top 10 News

राशी भविष्य