Tuesday, 13 November 2018

खरंच मुंबई खूप श्रीमंत आहे; श्रीमंतीचा आकडा पाहून तुमचेही डोळे फिरतील

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मायानगरी मुंबापुरीने आघाडीच्या सर्वात श्रीमंत 15 शहरांमध्ये 12वा क्रमांक पटकावला आहे. देशाची आर्थिक राजधानी हे बिरुद मिरवणाऱ्या मुंबईची एकूण श्रीमंती 950 अब्ज अमेरिकी डॉलरवर गेली आहे. सर्वात श्रीमंत 15 शहरांमध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराचा प्रथम क्रमांक लागला आहे. याविषयीचा अहवाल 'न्यू वर्ल्ड वेल्थ' या संस्थेने तयार केला आहे.

या अहवालानुसार, मुंबईच्या नंतर 944 अब्ज डॉलर संपत्ती असलेल्या टॉरोन्टोचा व त्यानंतर 912 अब्ज डॉलर संपत्तीच्या फ्रँकफर्टचा तसेच 860 अब्ज डॉलर संपत्ती असलेल्या पॅरिसचा क्रमांक लागला आहे. एकाच शहरातील सर्वाधिक अब्जाधीशांची गणनाही या संस्थेने केली आहे. त्यामध्ये जगातील सर्वाधिक अब्जाधीश असणाऱ्या शहरांमध्येही मुंबईचा समावेश झाला आहे. मुंबईमध्ये 28 अब्जाधीश आहेत. यामध्ये एक अब्ज डॉलर किंवा त्यापेक्षा अधिक निव्वळ मत्ता असलेल्या व्यक्तींचा समावेश आहे.

मुंबईबद्दल न्यू वर्ल्ड वेल्थ अहवालाने विशेष टिप्पणीही केली आहे, 'मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. याच शहरात जगातील 12वा सर्वात मोठा भांडवल बाजार - मुंबई शेअर बाजार (बीएसई) आहे. मुंबईमध्ये वित्तसेवा, स्थावर मालमत्ता व प्रसारमाध्यमे हे आघाडीचे उद्योग आहेत. आगामी दहा वर्षांत संपत्तीवृद्धीच्या बाबतीत मुंबईची वाढ सर्वाधिक वेगाने होईल.'

loading...

Top 10 News

राशी भविष्य