Tuesday, 11 December 2018

12वीच्या परीक्षा तोंडावर आसताना, राज्यभरात कनिष्ठ महविद्यालयीन शिक्षकांचा संप

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

कनिष्ठ महविद्यालयातील शिक्षकांकडून आज राज्यभर कॉलेज बंद आंदोलन पुकारण्यात येणार आहे. त्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रातील कनिष्ठ महाविद्यालय बंद असणार आहेत. एकीकडे 12 वीची परीक्षा जवळ आलेली असताना, अनेक कॉलेजमध्ये सराव परीक्षा सुरु आहेत. मात्र, आज कॉलेज बंद असल्याने या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मान्य मागण्यांच्या अंमलबजावणी आणि पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघातर्फे राज्यात पाच टप्प्यात आंदोलन करण्यात येत असून, आज चौथ्या टप्प्यात राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयं बंद करुन सर्व जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयांसमोर आणि मुंबईत आझाद मैदान येथे ‘जेलभरो आंदोलन’ करण्यात येईल.

सरकारने तातडीने मागण्यांच्या अंमलबजावणीबाबत आदेश न काढल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार असून, नाईलाजाने बारावी बोर्ड परीक्षेच्या काळात 'बहिष्कार आंदोलन' करण्यात येईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी सरकारचीच असेल, असा इशारा संघटनेने दिला आहे.

 

शिक्षकांच्या प्रमुख मागण्या काय आहेत?

1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत आलेल्यांनासुद्धा जुनी पेन्शन योजना लागू करणे.

2012 पासूनच्या शिक्षकांना नियुक्ती मान्यता व वेतन देणे.

सर्व शिक्षकांना 24 वर्षांच्या सेवेनंतर निवडश्रेणी देणे.

कायम विना अनुदानित शिक्षकांना अनुदान द्यावे.

माहिती तंत्रज्ञान शिक्षकांना अनुदान द्यावे.

2003 ते 2011 पर्यंतच्या वाढीव पदांवरील शिक्षकांना नियुक्ती मान्यता व वेतन द्यावे.

सातवा वेतन आयोग तातडीने लागू करावा.

वरील तसेच, इतर 32 मागण्यांचे निवेदन शासनास देण्यात आले आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य