Sunday, 20 January 2019

लाईफलाईनच्या प्रवासात निष्पापांचे बळी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

सकाळी एकदा घरातून निघाल्यावर परत घरी येणार की नाही, याची शाश्वती आपण देऊ शकत नाही. बाहेर आपल्याला कोणत्या संकटाला तोंड द्यावे लागणार हे आपल्याला माहित नसते.

दैनंदिनी जीवनात आपणाला प्रवासासाठी मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी रेल्वे महत्वाची ठरते. पण, हीच मुंबईची लाईफलाईन मृत्यूचा सापळा बनत चालली आहे.

2017 मध्ये रेल्वे प्रवासात एकूण 3 हजार 14 प्रवाशांचा विविध कारणांमुळे मृत्यू झालाय. लोकल मध्ये तर सर्वाधिक मृत्यू हे गर्दी आणी रेल्वे रूळ ओलांडताना झाले आहेत .

मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर दररोज 75 लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. दिवसेंदिवस या संख्येत वाढ होत आहे. मात्र, त्याचबरोबर अपघाती मृत्यू  वाढत आहेत.

सगळ्यात जास्त मृत्य आणि अपघात हे ठाण्या पाठोपाठ कल्याण रेल्वेचे तसेच, अंधेरी आणि बोरिवली या स्थानकांवरही झाल्याचे समोर आल आहे.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य