Sunday, 18 November 2018

ट्रकच्या धडकेत चिमुकल्याने गमावला जीव

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात संथगतीने सुरू असलेली रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाची कामे नागरिकांच्या जीवावर बेतली आहेत. कल्याण पश्चिम येथील संतोषीमाता रोडवर मंगळवारी झालेल्या भीषण अपघातात एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाला.

जयस्लीन कुट्टी असे या विद्यार्थ्यांचे नाव असून इयत्ता सहावीत शिकणारा जयस्लीन सायंकाळी क्लासला जात असतांना समोरून येणाऱ्या ट्रकने त्याला धडक दिली. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले.

पण, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामातील दिरंगाई हे अपघाताचे मुख्य कारण असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य