Friday, 18 January 2019

मध्यरात्री चिमुरड्याने घराची कडी उघडली अन्... त्याच्या प्रतापाने संपूर्ण गावाची झोप उडाली

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

खर आहे की लहान मुलांची मन कधी तळ्यात तर कधी मळ्यात असतात. कधी त्यांच्या मनात काय येईल त्याचा थांगपत्ता लागण थोड कठीणचं असतं. त्यामुळे अक्षरशहा घरातल्यानां त्यांच्या लहानग्यांकडे खूप लक्ष द्याव लागत. त्यातल्या त्यात आईचा आपल्या बाळा विषयाचा जिव्हाळा काही वेगळाच असल्यानं आईची जबाबदारी ही जास्तच येते. असं वारंवार का सांगितलं जातं, याची प्रचिती वसईतल्या कोळी कुटुंबीयांना आली आहे. रात्री आई-वडील झोपलेले असताना अडीच वर्षाच्या मुलाने केलेल्या प्रतापाने संपूर्ण गावाची मात्र झोप उडाली.

नायगावच्या खोचीवड्यातला अडीच वर्षांचा नॅथलीन 13 जानेवारी रोजी मध्यरात्री 2 वाजता झोपेतून अचानक उठला. त्यानंतर त्याने बेडरुमची कडी काढली व तसाच पुढे गेला. मग त्याने घराची कडी काढली. त्यानंतर त्याने गेटची कडी काढून तो घराबाहेर पडला. रात्रीच्या अंधाऱ्या गल्लीत तो तसाच चालत राहिला. थोड-थोडकरत नॅथलीनं दोन किलोमीटरचा पल्ला गाठला. आपला बच्चू रात्रीच घरातून बाहेर निघून गेला असल्याची पुसटशी कल्पना ही नॅथलीनच्या आई-वडीलांना नव्हती. इकडे सकाळी उठल्यावर जेव्हा 5 वाजता नॅथलीनचे पालक जागे झाले आणि त्यांना नॅथलीन दिसला नाही तेव्हा त्यांच्या काळजाचा ठेका चुकला.

अख्खा गाव नॅथलीनला शोधू लागला. नको-नको ते विचार आई-वडीलांच्या मनात येऊ लागले. कुणी शेजाऱ्यांकडे त्याचा शोध घेतला,तर कुणी इकडे-तिकडे शोधले. कुणी त्याचं अपहरण तर केलं नसेल ना? असे प्रश्न डोक्यात येऊ लागले. या सगळ्या गोंधळात 8 वाजले आणि व्हॉट्सॅपवर एक मेसेज आला आणि नॅथलीनच्या आई-बापांचा जीव भांड्यात पडला.

baby.png

नॅथलीन जेव्हा मध्यरात्री रस्त्यावर निवांत फिरत होता तेव्हा दोन भल्या माणसांनी त्याला पोलीस ठाण्याला पोहोचवलं. याच नागरिकांच्या सर्तकतेमुळे नॅथलीन आणि त्याच्या पालकांची पुन्हा भेट होऊ शकली.

loading...

Top 10 News

राशी भविष्य