Friday, 18 January 2019

मुंबईच्या जुहू येथून उड्डाण केलेल्या ओएनजीसीच्या हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला अन्... समुद्रात घडली थरारक घटना

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

ओएनजीसीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचे अवशेष डहाणूजवळच्या समुद्रात सापडले आहेत. तसंच हेलिकॉप्टरमधील बेपत्ता झालेल्या सातपैकी चौघांचे मृतदेह हाती लागले आहेत.

ओएनजीसीच्या डाऊफिन एएस 365 एन3 या हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला होता. या हेलिकॉप्टरमध्ये दोन वैमानिकांसह ओएनजीसीचे पाच कर्मचारी प्रवास करत होते.

ह्या हेलिकॉप्टरने सकाळी 10 वाजून 20 मिनिटांनी जुहू इथून उड्डाण केलं होतं. परंतु समुद्रात 30 नॉटिकल मैल अंतरावर असताना, सकाळी 10.35 वाजता हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला.

यानंतर तटरक्षक दलाने शोध मोहिम हाती घेतली.  तर नौदलाच्या काही बोटी आणि विमानं डायव्हर्ट करुन हेलिकॉप्टरचा शोध सुरु घेत होते. याशिवाय एअर ट्रॅफिक कंट्रोल सातत्याने हेलिकॉप्टरशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत होतं. अखेर त्याचे अवशेष समुद्रात आढळले.

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य