Friday, 14 December 2018

कमला मिल आगप्रकरणी वन अबव्हच्या दोन्ही मालकांना अटक

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

लोअर परळ भागातील कमला मिल कंम्पाउंडमधील इमारतीला लागलेल्या आगप्रकरणी पोलिसांनी 'वन अबव्ह' रेस्टोपबच्या दोन्ही मालकांना अटक केली आहे. 'वन अबव्ह' चे मालक जिगर संघवी आणि कृपेश संघवी या दोघांना पोलिसांनी गुरूवारी मुंबईतून ताब्यात घेतले. कमला मिलमधील अग्नितांडवानंतर हे दोघेही आरोपी फरार होते.

गेले काही दिवस ते आपल्या वेगवेगळ्या नातेवाईकांकडे लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. लवकरच ते देश सोडून जाण्याच्या तयारीत होते. मात्र, त्याआधीच मुंबई पोलिसांनी त्यांना अटक केली. बुधवारी पोलिसांनी या दोघांचा मित्र विशाल कारिया याला अटक केली होती. कमला मिलमध्ये 'मोजोस बिस्त्रो' आणि ‘वन अबव्ह’या पबमध्ये 29 डिसेंबर रोजी रात्री भीषण आग लागली.

या आगीत 14 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी 'वन अबव्ह' चे मालक कृपेश संघवी, जीगर संघवी, अभिजीत मानकर, 'मोजोस बिस्त्रो'चे मालक युग पाठक, युग टुलीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

loading...

Top 10 News

राशी भविष्य