Sunday, 23 September 2018

मनसेतून सेनेत प्रवेश केलेल्या नगरसेवकांचा दोन दिवसांत फैसला

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या मुंबईतील सहा नगरसेवकांचा लवकच फैसला होण्याची शक्यता आहे. कोकण आयुक्त बुधवारी किंवा गुरुवारी यासंदर्भात निकाल देतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मनसेने या नगरसेवकांवर पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर, या सहा नगरसेवकांनी कोकण आयुक्तांकडे वेगळ्या गटांची मागणी केली आहे.

मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून हे प्रकरण प्रलंबित आहे. त्यावर किंवा कोकण आयुक्त बैठक बोलवून फैसला देण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे कोकण आयुक्त काय निर्णय देतात त्यावर पुढची गणितं अवलंबून असणार आहेत. सहा नगरसेवकांच्या पक्षांतरावर मनसेनेही वेळोवेळी आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे पात्र झाल्यास हे नगरसेवक शिवसेनेसाठी काम करतील. पण जर अपात्र ठरले तर पुढे काय हा प्रश्न शिवसेनेपुढे उभा राहील.

loading...

Top 10 News

राशी भविष्य

Facebook Likebox