Saturday, 15 December 2018

आमदारांचा ‘मनोरा’ पडणार

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मंत्रालयासमोरील मनोरा आमदार निवास येथे नवीन आमदार निवासाची इमारत बांधण्यासाठी सध्याची इमारत पाडण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या 1 फेब्रुवारीपासून मनोरा आमदार निवासातील कक्ष रिकामे करण्याचा आणि तेथील वीज, पाणीपुरवठा खंडित करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मनोरा आमदार निवास पुनर्बांधणी उच्चाधिकार समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

पुनर्बांधणीसाठी पर्यावरण विषयक व इतर विविध परवान्यांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने एनबीसीसीला सहकार्य करावे व लवकरात लवकर परवाने मिळवून द्यावेत, असे यावेळी समितीच्या वतीने निर्देश देण्यात आले. तसेच, बांधकाम लवकर सुरू करण्यासाठी 1 फेब्रुवारीपासून आमदार निवासातील कक्ष रिकामे करावेत व तेथील वीज, पाणी पुरवठा खंडित करण्याचे निर्देशही देण्यात आले.

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य