Friday, 18 January 2019

मुंबईत कांजूरमार्गमध्ये हिंदी मालिकांचे शूटींग सुरु असलेल्या स्टुडिओला भीषण आग

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई 

 

मुंबईत कांजूरमार्गमध्ये हिंदी मालिकांचे शूटींग सुरु असलेल्या स्टुडिओला भीषण आग लागली आहे. 

कांजूरमार्गमध्ये गांधी नगर परिसरात हा स्टुडिओ आहे. सिने विस्ता असं या स्टुडिओचं नाव आहे.

कांजूरमार्गमधील पवई टेलिफोनसमोर हा सिनेविस्टा नावाचा स्टुडिओ आहे. या स्टुडिओत प्रामुख्याने हिंदी मालिकांचे शूटिंग चालतं. तसंच जुन्या थीमचा सेटही या स्टुडिओत उभारण्यात आला होता.

'बेपनाह' आणि 'हासील' मालिकेची शूटिंग सुरू असताना आग लागल्याचे समजते. सर्व लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.

अग्नीशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य