Saturday, 15 December 2018

डूडलच्या माध्यमातून प्रसिद्ध शायर मिर्जा गालिब यांना गूगलची मानवंदना

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई  

गूगलने डूडलच्या माध्यमातून मिर्जा गालिब यांना मानवंदना दिली आहे. आज प्रसिद्ध शायर मिर्जा गालिब यांची 220 वी जंयती आहे. या निमित्ताने गूगलने डूडलच्या माध्यमातून मिर्जा गालिब यांना मानवंदना दिली आहे. गुगलने गालिब यांचा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये बॅकग्राउंडला मुगलकालीन वास्तुकला दिसत आहे. गालिब एक असे शायर आहेत, ज्याच्यांसाठी भारत आणि पाकिस्तानाचे प्रेम एकसारखेच आहे. जेवढी प्रसिद्धी त्यांना भारतात मिळाली. पाकिस्तानमध्येही त्यांची तेवढीच ख्याती आहे.

 

मिर्जा गालिब यांचा जन्‍म 27 डिसेबंर 1796 या दिवशी उत्तर प्रदेशच्या आगरामधील एका सैन्य परिवारात झाला होता. त्यांचे पूर्ण नाव असद-उल्लाह बेग खां उर्फ गालिब असे होते. गालिब यांना उर्दू भाषेतील सर्वात महान शायर मानले जाते. पारसी कवितांना हिंदू भाषेत लोकप्रिय करण्याचे श्रेयही त्यांना दिले जाते. सन् 1841 मध्ये गालिब यांच्या गजलांचा पहिला संग्रह दीवान-ए-गालिब या नावाने प्रकाशित झाला. पुढे 1869 मध्ये त्यांचा मृत्यू झाला.

loading...

Top 10 News

राशी भविष्य