Sunday, 20 January 2019

नवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार

User Rating: 4 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

नवी मुंबईच्या कोपर खैरणे रेल्वे स्थानकावरचा एक धक्कादायक प्रकार समोर आलाय.

कोपर खैरणे रेल्वे स्थानकवरचे स्टेशन मास्तर अधिकारी मद्यपान करत असल्याचं आढळून आलंय.

मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरे यांच्या पत्राची प्रत देण्यासाठी गेले असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलायं. यावेळी स्टेशन मास्तर रमण चंद्र झा आपल्या सहकाऱ्यांसह मद्यपान करत होते.

मनसे कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना पार्टीविषयी जाब विचारला असता चक्क अधिकाऱ्यांनी प्रकरण मिटवण्याची विनंती केली.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य