Monday, 24 September 2018

महिला पोलिस अधिकारी बेपत्ताप्रकरणी एकनाथ खडसेंच्या भाच्याला पोलीस कोठडी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

अश्विनी बिद्रे बेपत्ताप्रकरणी माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंचे भाचे राजू पाटील यांना कळंबोली पोलिसांनी अटक केलीय.

राजू पाटील यांना पनवेल न्यायालयात हजर केले असता न्यायालयानं 15 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावलीय. याआधी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर यांना अटक करण्यात आलीये.

सुमारे दीड वर्षांपूर्वी कळंबोली पोलीस ठाण्यात रुजू होण्यासाठी रवाना झालेल्या अश्विनी बिद्रे बेपत्ता आहेत.

पण, त्या स्वतः गायब झाल्या नसून त्यांना अभय कुरुंदर यांनी बेपत्ता केला असल्याचा आरोप अश्विनी यांचे बंधू आनंद बिद्रे यांनी केला होता. अश्विनी आणि अभय यांच्यात प्रेमसंबंध होते. पण कालांतराने त्यांच्यात मतभेद निर्माण झाले. त्यातूनच अश्विनी यांना कुरुंदकर यांनी बेपत्ता केल्याचा दावा बिद्रे कुटुंबीयांनी केला होता.

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य

Facebook Likebox