Friday, 19 October 2018

बसची वाट बघता-बघता 'ती' आयुष्याची वाट हरवून बसली

User Rating: 5 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Active
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मुंबईतल्या चेंबूर येथे आज सकाळी 45 वर्षीय महिलेच्या अंगावर झाड पडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

चेंबूर परिसरातील आच्यार्य गार्डन येथे  महिला कामाला जात असताना हि घटना घडली.

गुरुवारी सकाळी बस स्टॉपवर बसची वाट बघत असताना अचानक एक मोठे झाड या महिलेच्या अंगावर कोसळले. त्यामुळे महिला प्रचंड जखमी झाली.  घटनेनंतर तात्काळ या महिलेला उपचारासाठी पालिकेच्या रुग्णालयात नेण्यात आले.

पण तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. शारदा घोडेस्वार असे या महिलेचं नाव असून ती पांजरापोल येथील रहिवासी आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य