Friday, 19 October 2018

मुंबई विद्यापीठाचा नवा परीक्षा गोंधळ

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मुंबई विद्यापीठाच्या पदवी परीक्षांच्या नियोजनातील गोंधळानंतर आता पदव्युत्तर पदवी परीक्षांच्या नियोजनाचा गोंधळ सुरु झालाय.

यंदा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रकिया अगदी नोव्हेंबर महिन्यापर्यंत सुरु असतांना विद्यापीठाने डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात या अभ्यासक्रमाच्या परीक्षा असल्याचे जाहीर केलंय.

त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. बहुतांश परीक्षा या डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात सुरु होणार आहेत.

संगणकआधारित मूल्यांकन पद्धतीमुळे यावर्षी पदवी परीक्षांचे निकाल लांबले असल्याने पदव्युत्तर पदवी परीक्षांची प्रवेश प्रकिया अगदी नोव्हेंबरपर्यत सुरु होती.

नियमानुसार अभ्यासक्रमाचे वर्ग किमान ९० दिवस भरल्यानंतर परीक्षा घेता येतात. पण, विद्यापीठाने या नियमाचे उल्लंघन करीत वर्ग भरुन ५० दिवसही पूर्ण झाले नसताना परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केलंय.

loading...

Top 10 News

राशी भविष्य