Friday, 19 October 2018

सिनेमाला जायचं प्लॅनिंग करताय, हे नक्की वाचा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

सिनेमागृहात गेल्यानंतर तुम्हाला बाहेरचे खाद्यपदार्थ प्रवेशद्वारावरच काढून ठेवावे लागतात. मात्र, ग्राहकाला हवं ते अन्न सिनेमागृहात नेऊन खाण्याचा अधिकार आहे. सिनेमागृह व्यवस्थापन ग्राहकाला अडवू शकत नाही, अशी माहिती राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांनी दिली.

ग्राहकाला त्यांचे मूलभूत अधिकार मिळालेच पाहिजे, असे सांगत देशपांडे म्हणाले , सिनेमागृहामध्ये बाहेरचे खाद्यपदार्थ, पाणी घेऊन जाण्याबाबत बंदी नाहीच. चित्रपटगृहातील द्वारपालाने मागणी केल्यास त्यांना बाटलीतील पाणी किंवा घरून नेलेल्या अन्नपदार्थांबाबत खात्री करून दिल्यास कोणतीही अडचण नाही, तरीही अडवणूक केल्यास ग्राहकांनी नियम विचारला पाहिजे.

यासंदर्भात ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव आणि जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. भारत कदम यांच्याकडे तक्रार करावी. तसेच, प्रशासकीय यंत्रणेला माहिती द्यावी, असेही देशपांडे यांनी सांगितले आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य