Friday, 18 January 2019

तिच्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मुंबईच्या कुर्ला येथील ठक्कर बाप्पा परिसरात एका युवकाने अल्पवयीन मुलीची छेडछाड करत भर रस्त्यात मारहाण करुन धारदार शस्त्राने तिच्या नाकावर वार केले. हा सर्व प्रकार जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अतिशय निर्दयीपणे आरोपीने युवतीला मारहाण केल्याचे यामध्ये दिसून आले आहे.

पीडित मुलीच्या नातेवाईकांनी जखमी अवस्थेत  मुलीला राजावाडी रुग्णालयात भरती केले. 17 आक्टोबर रोजी ही घटना घडली असून पीडित मुलीने नेहरूनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. याबाबत कारवाई करत पोलिसांनी आरोपी इम्रान शेख याला अटक केली. पण पीडित अल्पवयीन असल्यामुळे आरोपीवर कडक कारवाई न करता त्याला तात्काळ जामीनही मिळाला. यामुळे आरोपींवर कायद्याची दहशत कशी बसणार असा प्रश्न उपस्थित राहिला आहे.   

loading...

Top 10 News

राशी भविष्य