Wednesday, 13 December 2017

सर्वात जास्त सरपंच निवडून आले असा भाजपचा दावा म्हणजे पोरकटपणाचे लक्षण - सुप्रिया सुळे

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

राज्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुका या राजकीय पक्षांच्या चिन्हावर लढल्या जात नसतात त्यामुळे भाजपचे सर्वात जास्त सरपंच निवडून आले असा दावा करणे म्हणजे पारेकटपणाचे लक्षण असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर केली.

विजयी उमेदवारांचे स्वागत करायचे आणि ते आमचेच आहे असे म्हणायचे हे योग्य नाही. नाहीतर आम्हीही दावा करू शकलो असतो, पण आम्ही उमेदवार इंम्पोर्ट करत नाही अशी खोचक टीकाही सुप्रिया सुळेंनी केली.

तर, एकीकडे तुम्ही मेट्रो, बुलेट ट्रेन आणता, त्याला माझा विरोध नाही. पण त्याच बरोबर ग्रामीण भागात जाणारी माझी एसटी देखील सुधारा अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. जागर जाणीवांचा उपक्रमाअंतर्गत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित युवा संवाद यात्रेनिमित्त औरंगाबादेत पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

Top 10 News

झटपट रेसिपी

Facebook Likebox

Popular News