Saturday, 21 July 2018

...म्हणून एलफिन्स्टनचा रेल्वे ब्रीजवर चेंगराचेंगरी झाली

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

पूल पडल्याची अफवाच एलफिन्स्टन दुर्घटनेस कारणीभूत आहे, रेल्वे हत्याकांडप्रकरणी असा अहवाल सादर करण्यात आला. मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांमार्फत याची चौकशी झाली असून, तो पश्चिम रेल्वेला सादर करण्यात आला.

29 सप्टेंबर, 2017ला एलफिन्स्टन रोड स्थानकातील पादचारी पुलावर गोंधळ झाला. त्यात 23 प्रवाशांचा मृत्यू झाला, तर 38 प्रवासी जखमी झाले. रेल्वेकडून विविध पातळ्यांवर या घटनेबाबत चौकशी सुरू करण्यात आली. 

स्थानकात उपस्थित असणाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली होती. या दुर्घटनेचे कारण शोधतानाच अहवालातून काही उपाययोजनाही मुख्य सुरक्षा अधिकाऱ्याकडून सुचविण्यात आल्या आहेत.

काय आहेत या सूचना 

पुलाचा विस्तार आणि रुंदीकरण करण्यात यावं 

पुलावरील तिकीट खिडकी अन्यत्र हलवावी

रेल्वे आणि सुरक्षा कर्मचारी इत्यादींना हॉटलाइनसारख्या गोष्टी पुरवण्यात याव्यात 

उपाहारगृहांचे अन्यत्र स्थलांतर करावं

स्थानकाजवळील अतिक्रमण मोडीत काढावं

जड सामान घेऊन जाणाऱ्यांना मनाई करा

loading...

Top 10 News

Facebook Likebox