Saturday, 21 July 2018

मुंबईत शिवसेनेच्या दोन गटांत तुफान हाणामारी; दोनजण गंभीर जखमी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबईत शिवसेनेच्या दोन गटांत हाणामारी झाल्याचं पाहायला मिळाले. शिवसेना नगरसेविका किशोरी पेडणेकर आणि माजी शाखाप्रमुख राजेश कुसळे यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली.

 

कुसळे यांना पदावरून हटवण्यात आल्याने ही हाणामारी झाली. तर, दोन जण जखमी असून त्यांना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

मुंबईतील अनेक शाखांचे शाखाप्रमुख बदलण्यात आले असून वरळी विधानसभेत शाखाप्रमुख राजेश कुसळे यांना पदावरून हटवल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये रोष पसरला.

 

महापालिका निडणुकीत कुसळे यांनी प्रभाग क्रमांक 199 मधून आपल्या पत्नीसाठी उमेदवारी मागितली होती. परंतु, तिथे महिला विभाग संघटक किशोरी पेडणेकर यांना उमेदवारी दिली होती.

 

किशोरी पेडणेकर निवडून आल्यानंतर कुसळे यांची बेस्ट समितीवर सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली होती. त्यामुळे पेडणेकर यांनीच कुसळे यांना हटवून खाडे यांना 199 च्या शाखाप्रमुखपदी आणण्याचा घाट घातल्याचे समजते. त्यामुळे दोन्ही गटांमध्ये ही हाणामारी झाली.

loading...

Top 10 News

Facebook Likebox