Saturday, 21 July 2018

लवकरच मुंबई ते मांडवा रोरो फेरी बोटसेवा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 
मुंबई ते मांडवा लवकरच रोरो फेरी बोटसेवा मिळणार आहे. रस्ते वाहतुकीला पर्याय म्हणून मुंबईतील नवीन भाऊचा धक्का ते रायगड जिल्ह्यातील मांडवा बंदर जलवाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

या जलमार्गावर जलवाहतूक सुरू करण्याच्या प्रकल्पास शासनाने मान्यता दिली. रो-रो प्रवासी वाहतुकीकरिता महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डामार्फत जेट्टी आणि प्रवासी टर्मिनल बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

 

हे काम  मार्च-2018 पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे. एका फेरीत बोटीमधून सुमारे 350 प्रवासी आणि 40 कार एकाच वेळी प्रवास करू शकतील, अशी योजना आहे.

 

पावसाळ्यातील अतिवृष्टी आणि वादळसदृश्य परिस्थितीचे काही अपवादात्मक दिवस वगळता ही सेवा वर्षभर सुरू राहणार आहे.

loading...

Top 10 News

Facebook Likebox