Tuesday, 13 November 2018

पीक विमा अर्ज भरण्याची मुदत 10 ऑगस्टपर्यंत करा- अजित पवार यांची विधानसभेत मागणी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

पीक विम्यासाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. मात्र, शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ऑनलाईन अर्ज भरताना जिल्ह्यातील ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टिव्हीटीचा अभाव, वारंवार लॉग आऊट, तसेच ऑनलाईन अर्ज अपलोड करण्यास होत असलेला विलंब इत्यादी तांत्रिक अडचणी येतात.

 

तसेच घरातील सर्व सदस्यांच्या सह्यांची गरज असल्यानं अर्ज भरण्यासाठी घरातील सर्वच मंडळींना केंद्रावर जाण्याची वेळ येते. या अडचणींमुळे अकोल्यात शेतकरी संतप्त झाला आणि त्यांनी रास्ता रोको केला.

 

दरम्यान, विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. पीक विम्याची मुदत 10 ऑगस्टपर्यंत वाढवा अशी मागणी अजित पवार यांनी केली.

loading...

Top 10 News

राशी भविष्य