Wednesday, 16 January 2019

सदाभाऊ खोत संघटनेतून बाहेर पडतील असं वाटत नाही - राजू शेट्टी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

चळवळीतून मोठे झालेले कार्यकर्ते संघटनेशी प्रतारणा करणार नाहीत. संघटनेच्या कडक शिस्तीचा त्रास काही लोकांना मानवत नाही. मात्र, सदाभाऊ खोत संघटनेतून बाहेर

पडतील असं वाटत नाही असं खासदार राजू शेट्टी म्हणालेत. सोलापुरातील मांढरा तालुक्यातील एका कार्यक्रमात राजू शेट्टी बोलत होते.

 

दरम्यान, असल्या किरकोळ लोकांच्या टीकेला उत्तर द्यायला मला वेळ नाही असं म्हणत राजू शेट्टींनी रघुनाथदादा पाटलांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

 

शनिवारी कोल्हापुरात झालेल्या कार्यकर्मात रघुनाथ पाटलांनी राजू शेट्टींवर टीका केली होती. सदाभाऊ खोत यांनी संघटनेतून बाहेर पडावं, असा सल्ला देत शेट्टी आणि खोत

यांच्यात फक्त वाटणीसाठी भांडणं सुरु आहे. अशी टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटलांनी केली होती.

loading...

Top 10 News

राशी भविष्य