Saturday, 15 December 2018

मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी अबू सालेम आणि मुस्तफा डोसासह सहाजण दोषी; कय्युम शेखची निर्दोष सुटका

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबई शहराला हादरवून सोडणा-या 1993 सालच्या साखळी बॉम्बस्फोट मालिका प्रकरणी विशेष टाडा न्यायालयाने सहा आरोपींना कोर्टाने दोषी ठरवले.

 

तर, एका आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयाने कट रचल्या प्रकरणी मुस्तफा डोसाला दोषी ठरवले आहे. कट रचण्यासाठी दुबईत झालेल्या बैठकीला मुस्तफा

त्याचा भाऊ मोहम्मद डोसा आणि दाऊद इब्राहिमसह उपस्थित होता असे न्यायाधीशांनी सांगितले.

 

शस्त्रास्त्र उतरवण्यासाठी मुस्तफा डोसाने मदत केल्याचेही सिद्ध झाले आहे. हत्या आणि कट रचल्याच्या आरोपाखाली फिरोझ खानलाही टाडा न्यायालयाने दोषी ठरवले.

फिरोझ खान, ताहीर मर्चंट,करीमुल्ला खानलाही टाडा न्यायालयाने दोषी ठरवले आहे. अबू सालेमला टाडा न्यायालयाने दोषी ठरवले आहे. तसेच कय्युम शेखची कोर्टाने

निर्दोष मुक्तता केली आहे. सोमवारपासून दोषींवर शिक्षा सुनावली जाणार आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य