महाराष्ट्र

कचऱ्यात फेकून दिला 10 ट्रक तांदूळ आणि गहू

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर

 

लोकांना रेशन दुकानांवर वेळेवर धान्य मिळत नसताना नागपूरच्या डम्पिंग ग्राऊंडवर तब्बल 10 ट्रक तांदूळ, गहू फेकल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने उपराजधानीत खळबळ उडाली आहे.

 

महापालिकेच्या भांडेवाडी डम्पिंग ग्राऊंडवर 7 जानेवारीपासून तांदूळ आणि गहू डम्प केला जात आहेत. विशेष म्हणजे कचरा टाकणाऱ्या कनक रिसोर्सेसच्या गाड्या हे धान्य इथं फेकत असून

याची नोंद महापालिकेच्या डम्पिंग यार्ड रजिस्टरमध्येही केली जात आहे.

 

पण, हा तांदूळ कुणाकडून आणला जातोय आणि तो कचऱ्यात टाकला का जातोय. या बद्दल कुणीही वाच्यता करत नाही. त्यामुळे नागपुरात तांदूळ घोटाळ्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

टॉप 10 न्यूज

लेटेस्ट व्हिडीओ

न्यूजरूम

महापालिकांचा महासंग्राम

Popular News