महाराष्ट्र

औरंगाबादमध्येही अकरावीची प्रवेशप्रकिया ऑनलाईन

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

 

मुंबई, पुण्या पाठे-पाठ नागपूर, अमरावती, नाशिक आणि औरंगाबादमध्येही अकरावी प्रवेश ऑनलाईन करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. आता हायर सेकंडरी व्होकेशनल कोर्सेसचे सर्व प्रवेशदेखील ऑनलाईन पद्धतीनेच देण्यात येणार आहे.

 

विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना किमान 1 ते कमाल 10 कॉलेजांचा पर्याय देता येणार आहे. अकरावी ऑनलाईन प्रक्रियेतून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एकावेळी एका प्रवेश अर्जाद्वारे कला, विज्ञान, वाणिज्य शाखांपैकी फक्त एकाच शाखेची मागणी करता येणार आहे.

 

विद्यार्थ्याच्या इच्छेनुसार प्रवेश अर्जातील भाग- 2 मध्ये शाखा बदलून पसंतीक्रम बदलण्याची मुभा देण्यात येणार आहे. याआधी ऑनलाईन अर्ज भरताना विद्यार्थ्यांना 50 महाविद्यालयांचा पसंतीक्रम देण्याची मुभा होती.

टॉप 10 न्यूज

लेटेस्ट व्हिडीओ

न्यूजरूम

महापालिकांचा महासंग्राम

Popular News