महाराष्ट्र

पोटाला चिमटा घेऊन ‘ते’ मुलींच्या नावे बँकेत 5 हजारांची FD करणार

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर

 

आपल्या समाजात मुलीचा जन्म झाला की, अजूनही नाकं मुरडली जातात. मात्र, असेही काही लोकं आहेत जे आपल्या पोटाला चिमटा घेऊऩ मुलींचं भविष्य सुरक्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत.  

 

पंढरपुरच्या मेथवडे गावातील अतुल पवार यांना 10 महिन्यांपूर्वी मुलगी झाली. आपल्या मुलीचा आनंद फक्त घरापुरताच साजरा न करता त्यांनी एक अभिनव उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला.

 

पंचक्रोशीत जी मुलगी जन्माला येईल तिच्यासाठी 5 हजारांची रक्कम बँकेत ठेवायची. जेणेकरुन हा पैसा मुलीच्या पुढच्या प्रगतीसाठी उपयोगी पडेल. त्यांच्या या समाजसेवेमुळे

पंचक्रोशीतील अनेक मुलींचे भविष्य सुरक्षित होणार आहे.   

टॉप 10 न्यूज

लेटेस्ट व्हिडीओ

न्यूजरूम

महापालिकांचा महासंग्राम

Popular News