महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणूकांच्या तारखा जाहीर, आचारसंहिताही लागू

User Rating: 1 / 5

Star ActiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

राज्यातील महापालिकांच्या निवडणूकांचं बिगूल वाजलं आहे. निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेऊन महापालिका निवडणूकांच्या तारखा जाहिर केल्या आहेत. राज्यामध्ये आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. 

 

मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यातील महत्त्वपूर्ण 10 महानगरपालिका आणि 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या. जिल्हा परिषद निवडणूका दोन टप्प्यांत होणार असून, सर्व 10 महानगरपालिकांसाठी एकाच दिवशी मतदान पार पडणार आहे.

 

जिल्हा परिषदेच्या पहिल्या टप्प्यांतील 14 जिल्ह्यांसह 165 पंचायत समितीकरता 16 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यांत 11 जिल्ह्यांसह 118 पंचायत समितीत 21 फेब्रुवारी रोजी मतदान जाहीर झालं आहे. तसंच 21 फेब्रुवारी रोजी सर्व 10 महानगरपालिकांसाठी मतदान पार पडणार आहे.

 

23 फेब्रुवारीला सर्व ठिकाणची मतमोजणी पार पडणार आहे. नक्षलग्रस्त भाग असलेल्या गडचिरोलीत दोन टप्प्यांत निवडणूका होणार असून, नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीला स्थगिती देण्यात आली आहे. निवडणूका जाहीर झालेल्या सर्व क्षेत्रांमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे.

LIVE UPDATES:

-नागपूर सोडून 25 जिल्हा परिषदांसाठी तारखा जाहीर

- गडचिरोलीत दोन टप्प्यांत होणार निवडणूक

 -10 महापालिकांच्या निवडणुका एकाच टप्प्यांत 

- पहिला टप्पा 15 जिल्हे 165 पंचायत समिती, दुसरा टप्पा 11 जिल्हे 118 पंचायत समिती निवडणुका

- दहा महापालिकांचं मतदान 21 फेब्रुवारीला, महापालिका आणि जिल्हा परिषदेची मतमोजणी 23 फेब्रुवारीला

- महापालिका आणि जिल्हा परिषदेची मतमोजणी 23 फेब्रुवारी रोजी होणार

- 10 महापालिकेसाठी 21 फेब्रुवारी, तर जिल्हा परिषदेसाठी 16 आणि 21 फेब्रुवारीला मतदान, 23 फेब्रुवारीला निकाल 

- निवडणूकीसाठी प्रत्येक उमेदवारानं स्वतंत्र बँक खातं उघडावं, निवडणूक झाल्यावर झालेला खर्च 30 दिवसाच्या आत निवडणूक आयोगाकड़े जमा करावा 

दहा महापालिका- मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, अकोला, अमरावती, सोलापूर

जिल्हा परिषद निवडणुका-

पहिल्या टप्प्यात औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, वर्धा, अहमदनगर, यवतमाळ, जळगाव, चंद्रपूर, गडचिरोली

- दुसऱ्या टप्प्यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर यांचा समावेश

टॉप 10 न्यूज

लेटेस्ट व्हिडीओ

न्यूजरूम

महापालिकांचा महासंग्राम

Popular News