Sunday, 20 January 2019

धुळे, नगरमध्ये महापालिकेसाठी आज मतदान

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

धुळे आणि अहमदनगर पालिकेसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. भाजपाचे आमदार अनिल गोटेंनी भाजपालाच आव्हानं दिल्याने धुळ्यातील निवडणूक ही चुरशीची ठरणार आहे. पालिकेच्या एकूण 74 जागांसाठी मतदान होणार असून धुळेकर कुणाला मतदान करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आह तर अहमदनगर पालिकेच्या 68 जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. नगरमध्ये भाजपा आणि शिवसेना वेगवेगळे लढत असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन ही निवडणूक लढवत आहेत.

तसेच धुळ्यात गिरीश महाजन,केंद्रीय मंत्री सुभाष भामरे आणि जयकुमार रावल या तिन्ही भाजपा नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, तर दुसरीकडे भाजपाचेच आमदार अनिल गोटेंनी वेगळं पॅनल उभं करून भाजपासमोर वेगळे आव्हान उभं केलं आहे. तर दुसरीकडे अहमदनगर पालिका निवडणुकीत भाजपा खासदार दिलीप गांधी आणि शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य