Friday, 14 December 2018

आता पोलीस दलात #MeToo चे वादळ

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

बाॅलिवूडमध्ये #MeToo प्रकरणाचे वादळ आले होते. या प्रकरणी देशातल्या अनेक मान्यवरांवरही आरोप झाले होते. मात्र आता हेच वादळ पोलीस दलातही वाहू लागल्याचे ऐकण्यात येत आहे. ज्यांच्यावर रक्षण करण्याची जबाबदारी आहे त्यांनीच असे कृत्य केल्यास नागरिकांनी कोणाकडे जायचं. या घटनेमुळं नागपूरच्या पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली आहे. 

नागपूरातल्या एका IPS अधिकाऱ्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिला पोलीस कर्मचाऱ्यानं त्याच्या विरूद्ध तक्रार दाखल केली होती. 

पी.आर. पाटील असं या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. नागपूरच्या लाचलुचपत विभागात पी.आर. पाटील हे अधिकारी आहेत. त्यांच्या विरूद्ध एका महिला कॉन्स्टेबलनं तक्रार दाखल केली होती.

याबाबत लाचलूचपत विभागाचे महासंचालक संजय बर्वे यांनी तक्रारीची गंभीर दखल घेऊन या प्रकरणाची विशाखा समितीमार्फेत चौकशी केली. या तक्रारीत तथ्य आढळल्याने पाटील यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आला आहे. या प्रकरणी काही पुरावेही पोलीसांच्या हाती लागले आहेत.

loading...

Top 10 News

राशी भविष्य