Friday, 14 December 2018

धक्कादायक! शालेय फीससाठी 7 वर्षीय विद्यार्थ्याला ठेवले डांबून

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

उदगीर येथील इंग्रजी माध्यमात इयत्ता दुसरीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांस शालेय फीससाठी शाळेच्या कार्यालयातच डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार 18 हजार रुपयांसाठी केल्याने शिक्षिका, संस्थाचालक यांच्यासह इतर अनेकजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय आहे

  • उदगीर शहरातील उद्य कॉलनी परिसरात लिटल इंग्लिश स्कूल आहे, या स्कूलमध्ये कार्तिक चंद्रशेखर स्वामी यांचा 7 वर्षाचा मुलगा शिक्षण घेत आहे.
  • शुक्रवारी दरोरजप्रमाणे कार्तिक शाळेच्या वाहनातून शाळेत गेला होता. मात्र दुपारी शाळा सुटल्यानंतरही तो परत आला नसल्याने वडिलांनी वाहनधारकाकडे विचारणा करून शोध घेत शाळा गाठली.
  • तेव्हा शाळेतील कार्यालयातच तो रडत बसलेल्या अवस्थेत पाहवयास मिळाला. तेव्हा विचारणा केली असता थकीत असलेली 18 हजार रुपये फीस दिली नसल्याने बालकास अटकावून ठेवल्याचे सांगण्यात आले. मात्र शनिवारी सकाळी सदर मुलगा शाळेत जाण्यास घाबरू लागला होता.
  • त्यामुळे वडिलांनी शनिवारी रात्री उदगीर ग्रामीण पोलीसांत शिक्षिका आशा ममदापूरे, संस्थापक राजकुमार ममदापूरे व सरअराज शेख या तिघांविरोधात फीससाठी मुलाला शाळेत डांबून ठवेल्याबाबत तक्रार नोंद केली आहे.

त्यानुसार 75 बालन्याय अधिनियमन 2015 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस याबाबत पुढील तपास करत आहेत. 

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य