Friday, 14 December 2018

निळवंडे धरणाच्या कामासाठी साई संस्थानकडून 500 कोटींची मदत

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

निळवंडे धरण्याच्या कालव्यांच्या कामासाठी शासनाकडे पैसे नसल्याने शासनाने साई संस्थानकडे 500 कोटी रुपयांची मागणी केले होती. साई संस्थान विश्वस्त मंडळाने फेब्रुवारी महिन्यात मंजुरीसाठी हे प्रकरण विधी खात्याकडे पाठले होते आणि त्याला आज मंजुरी मिळाल्या नंतर शासनाने साई संस्थानकडे 500 कोटींची मागणी केली होती, असे साई संस्थानचे उपअध्यक्ष चंद्रशेखर कदम म्हणाले आहेत.

तसेच महाराष्ट्र शासनाकडे पैसे नसल्याने त्यांनी साई संस्थानकडे उसने पैसे घेतले असून हप्त्या हप्त्याने करून साई संस्थानचे पैसे 10 वर्षात शासन परत फेड करणार आहे. साई संस्थान शासनाकडून एकही रुपया व्याज घेणार नसल्याचे उपअध्यक्ष चंद्रशेखर कदम यांनी म्हटले आहे. निळवंडे धरणाच्या रखडलेल्या नवीन कामांसाठी साई संस्थान पैसे देणार असून हे पैसे टप्या टप्याने देणार आहे. तसेच धरणाचे जुने रखडलेल्या कामांसाठी पैसे दिले नसल्याचे कदम म्हणाले आहेत.

loading...

Top 10 News

राशी भविष्य