Friday, 14 December 2018

आता ‘या’ गोष्टीचेही व्यसनमुक्ती केंद्र, पुण्यातील नवा उपक्रम

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

सध्याचा काळात इंटरनेट म्हणजे प्रत्येकाची गरज बनले आहे. इंटरनेटशिवाय पानही हलत नाही असं म्हणणं वावग ठरणार नाही. मात्र आता इंटरनेटच्या अतिवापरचे दुष्परिणामही समोर येत आहेत. यावर उपाय म्हणून पुण्यात राज्यातलं पहिलं इंटरनेट व्यसनमुक्ती केंद्र सुरू करण्यात आलं आहे.

आनंदवन व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्रातर्फे हे अभिनव केंद्र सुरू झालं आहे. अत्तापर्यंत फक्त दारू आणि ड्रग्जच्या आहारी गेलेल्यांसाठीच अशी व्यसनमुक्ती केंद्र उभारण्यात आले आहेत. मात्र आता लोक इंटरनेटच्याही आहारी जात असून तरूणांना त्याचे व्यसन लागल्याची माहिती या केंद्राचे संचालकांनी दिली आहे.

राज्यातील 25 टक्के लोकसंख्या इंटरनेट व्यसनाच्या आहारी गेली असून त्याचे दुष्परिणाम दिसत आहेत. स्मार्टफोन आणि सोशल नेटवर्किंग साइट्स च्या आहारी जाऊन रात्रभर जागरण केल्याने पुरेशी झोप न येणे, चिडचिडेपणा, एकटेपणा, शारीरिक, मानसिक संतुलन ढासळणे, संशयी वृत्ती वाढणे अशा गोष्टी दिसून येत आहेत.

ही गोष्ट लक्षात घेऊनच आनंदवन व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्राने हा नवा उपक्रम सुरू केला आहे.

या केंद्रात ई व्यसन, ध्यान, समुपदेशन, किशोरवयीन मुलांच्या समस्या, भीती ,नैराश्य यावर तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. तसेच या केंद्राद्वारे विविध शाळा आणि कॉलेजेसमध्येही जनजागृती करण्यात येणार आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य