Sunday, 20 January 2019

‘कार्तिकी एकादशी’ दिवशी पंढरपूरमध्ये मद्य आणि मांस विक्रीस परवानगी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

इतिहासात पहिल्यांदाच कार्तिकी यात्रेत एकादशी दिवशी पंढरपूरमध्ये मद्य  विक्रीस परवानगी देण्यात आल्याने जिल्हा प्रशासनाचा सावळा गोंधळ उघड झाला आहे. येत्या सोमवारी कार्तिकी एकादशी आहे. यानिमित्ताने पंढरपूरमध्ये लाखो भाविक विठू माऊलीच्या दर्शनासाठी येतात. त्यामुळे या दिवशी पंढरपूरमध्ये मद्य आणि मांस विक्रिवर बंदी घातली जाते. मात्र कार्तिकी यात्रेच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘कार्तिकी एकादशी’च्या दिवशी पंढरपूरमध्ये मद्य आणि मांस विक्रीस परवानगी देण्यात आली आहे.

दरवर्षी कार्तिकी एकादशीच्या दिवशी, त्याच्या आधीच्या आणि नंतरच्या एक दिवसासाठी म्हणजेच 3 दिवस म्हणजेच दशमी, एकादशी आणि द्वादशी या दिवसात पंढरपूरात मद्य व मांस विक्रिवर बंदी घातली जाते. मात्र यंदा 19 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीचा महासोहळा असुन जिल्हा प्रशासनाने फक्त 18 नोव्हेंबरला मद्य विक्रीस बंदी घातली आहे. 

mans-mady.jpg

 

त्यामुळे वारकरी भाविकांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे. तसेच हा निर्णय त्वरित मागे घ्यावा अशी मागणी वारकरी करीत आहेत.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य