Friday, 18 January 2019

नरभक्षक वाघिणीमुळे वन विभाग आलं अडचणीत

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

पांढरकवडा परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या वाघिणीने वन विभागाला अडचणीत आणलं आहे.

या प्रकरणाबाबत वन विभागाने तयार केलेला कृती आराखडा आणि प्रत्यक्षातील परिस्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश व्याघ्र प्राधिकरणाने वन्यजीव विभाग प्रमुखांना दिले आहेत.

कोणताही निर्णय घेताना काळजीपूर्वक घ्यावा आणि आदर्श आचारसंहितेचे कोणत्याही परिस्थितीत उल्लंघन होणार नाही याची काळजी घेण्याच्या सक्त सूचना प्राधिकरणाने दिल्या आहेत.

टी-1 वाघिणीच्या अभियानात आदर्श नियमांचे पालन होत नसून महाराष्ट्र वन विभागाने अत्यंत बेजबाबदार पद्धतीने हे प्रकरण हाताळल्याची टीका केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयांतर्गत येणाऱ्या प्राणी कल्याण मंडळाच्या सदस्यांनी केली होती.

या संदर्भात राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाकडे अनेक तक्रारी आल्यामुळे प्राधिकरणाने वन विभागाकडे स्पष्टीकरण मागितलं आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य